ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या टीचर पेजेस फेलो शिक्षिका श्रीमती चारुशीला भामरे या जिल्हा परिषदेच्या काकोळे शाळेत अध्यापनाचे कार्य करीत आहेत. वाचलेल्या उताऱ्याचे विद्यार्थ्यांनाआकलन झाले आहे किंवा नाही हे ओळखण्याची एक नवीन पद्धत आज त्यांच्या वर्गात आपण पहाणार आहोत. उताऱ्यावर आधारित योग्य आणि अयोग्य प्रश्न विद्यार्थ्याना देवून, त्यातील अयोग्य प्रश्न शोधायला लावणे ही ती अनोखी पद्धत आहे. विद्यार्थी जर अयोग्य प्रश्न शोधण्यात यशस्वी झाले तर त्याना उताऱ्याचे पूर्ण आकलन झाले आहे असे समजण्यास हरकत नाही. चला पाहूया टीचर पेजेस फेलो शिक्षिका श्रीमती चारुशीला भामरे यांच्या पाठाचा हा व्हिडीओ..
0 Comments